मुंबई – कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो “बिग बॉस’बाबत चाहते खूप उत्सुक आहेत. सलमान खान या शोचा होस्ट असल्यामुळे हा शो अनेकांना खूप आवडतो. आता बिग बॉसच्या सीझन 15साठी मेकर्सने सेलिब्रिटीजना अप्रोच करण्यास सुरुवात केली आहे.
मेकर्सने यावर्षी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती या दोघांना बिग बॉस सीझन 15मध्ये सहभागी होण्यासाठी अप्रोच केल्याचे समजते.
एका वेबसाइटच्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या मेकर्सने रिया चक्रवर्तीसोबत शोमध्ये भाग घेण्यासाठी संपर्क केला आहे. रिया शोमध्ये एन्ट्री घेण्यास तयार झाली तर मेकर्स अंकिता लोखंडेला पण अप्रोच करणार आहे. त्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, दोन्ही अभिनेत्री दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यामुळे जर दोन्ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात आल्या तर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत येईल आणि अनेक खुलासे होतील.
बिग बॉसच्या सीझन 15 साठी मेकर्सने अभिनेत्री दिशा वकानी, दिशा परमार, सुरभी चंदना, कृष्णा अभिषेक, नेहा मर्दा, जेनिफर विंगेटला अप्रोच केले आहे. याशिवाय अदा खान, तेजस्वी प्रकाश,
निकेतन धीर आणि अभिजित सावंत सारखी अनेक नावे या लिस्टमध्ये सामील आहेत, असे म्हटले जात आहे. गेल्या सीझनची विजेती रुबीना दिलैक होती आणि फर्स्ट रनर-अप राहुल वैद्य होता.