Ankita Lokhande – अभिनेत्री अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 चे विजेतेपद गमावले आहे. फिनालेपूर्वी अंकिता लोखंडे सोशल मीडियावर टॉप-2 सदस्यांपैकी एक मानली जात होती. मात्र, ग्रँड फिनालेच्या रात्री, मतांच्या कमतरतेमुळे, तिला मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि मुनावर फारुकी यांच्या पहिले घरातून बाहेर जावे लागले. यामुळे अंकिता लोखंडेचा चेहरा चांगलाच पडलेला दिसला आहे. अंकिताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहे की, ‘तिला पराभव सहन होत नाही त्यामुळे ती रडली.’
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या कुटुंबासह बिग बॉस 17 च्या सेटमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत आहे. तिचा उदास चेहरा पाहून लोकांचा अंदाज आहे की हरल्यानंतर ती खूप रडली.’
या व्हिडीओमध्ये बिग बॉस 17 चा विजेता घोषित झाल्यानंतर पापाराझी प्रत्येक बिग बॉस सदस्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी अंकिताने कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता थेट तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. इतकंच नाही तर तिच्या आईने सुद्धा प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
अंकिताच्या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “अंकिताची सासू खूप आनंदी दिसत आहे.” दुसऱ्याने लिहिले, “अरे दीदी, तिच्या पालकांनी तिचा विश्वासघात केला.” असं म्हणत या व्हिडिओवरून तिला ट्रोल केले जात आहे.