मुंबई – मनी लॉड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना सोमवारी विशेष न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणी ईडीने तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने फेब्रुवारीत समन्स बजावले होते.
ऋषिकेश देशमुख यांनी ऍड. अनिकेत निकम यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणी अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच जामीन मंजूर केल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला असला तरी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात ते तुरुंगातच आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खंडणीच्या आरोपावरून सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू आहे.