अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनला ११२० कोटींची करमाफी ?

नवी दिल्ली – भारत आणि फ्रान्स दरम्यानच्या राफेल करारानंतर अनिल अंबानी यांच्या फ्रान्स मधील रिलायन्स कम्युनिकेशन, या कंपनीला १४३.७ मिलियन युरो म्हणजे आत्ताच्या घडीला ११२० कोटी रुपयांची करमाफी दिली असल्याचे वृत्त, फ्रेंच वृत्तपत्र ‘ले मॉन्ड’ ने दिले आहे.

काँग्रेस पक्षाकडून राफेल करारावरून वारंवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून पुन्हा या मुद्द्याचा आधार घेत राफेल करारावरून नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. २०१५ मध्ये  भारत आणि फ्रान्स मध्ये राफेल विमानांच्या खरेदीसाठी बोलणी सुरू होती. नेमके याच वेळी फ्रान्स मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स टेलिकॉमचा १४३.७ मिलियन युरो म्हणजे भारतीय चलनानुसार ११२० कोटी रुपये करमाफ करण्यात आला, असे वृत्त ‘ले मॉन्ड’ ने दिले आहे.

अनिल अंबानी हे भारत आणि फ्रान्स दरम्यानच्या राफेल करार मध्ये ऑफसेट पार्टनर आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.