इस्लामाबाद – पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला श्वसनाचा त्रास आणि हृदयविकारामुळे लाहोरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, पुढील काही दिवस संपूर्ण विश्रांतीचा सल्लाही देण्यात आला आहे. इंजमामला सोमवारी अस्वस्थ वाटू लागले आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता.
त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या काही चाचण्या सुरू असतानाच त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे त्याच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली.
इंझमाम याची प्रकृती स्थिर असून, उपचारांनाही तो योग्य प्रतिसाद देत आहे. आता त्याची प्रकृती ठीक आहे.