“स्पायडर मॅन-‘मध्ये ऍन्ड्य्रू गारफिल्ड नाही

‘स्पायडर मॅन- नो वे होम’ या आगामी हॉलिवूड ऍक्‍शनपटात ऍन्ड्रू गारफिल्ड दिसणार आहे, अशी अफवा काही दिवसाम्पासून पसरली होती. मात्र ऍन्ड्रयू गारफिल्डने ही अफवा फेटाळून लावली आहे. टॉम हॉलांड यांच्या स्पायडर मॅनच्या तिसऱ्या फ्रॅन्चायजीमध्ये टॉब मॅग्वायर आणि ऍन्ड्रयू गारफिल्ड हे दोघेही दिसतील, अशी अफवा पसरली होती.

पूर्वी स्पायडर मॅनच्या सिनेमामध्ये या दोघांनीच स्पायडर मॅन साकारला असल्याने त्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती. “हॅपी, सॅड, कन्फ्युज्ड’मधील रोममुळे गारफिल्डच्या नावाची जोरात चर्चा सुरू झाली होती. आपल्याला ही संधी मिळाली असती तर हा रोल करायला नक्कीच आवडले असते. असे गारफिल्ड याने म्हटले आहे.

आपल्या चाहत्यांना आपण या रोलमध्ये दिसावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. आपल्याशी या रोलबाबत संपर्कही साधला गेलेला नाही, असेही गारफिल्डने स्पष्ट केले आहे. स्पायडर मॅन अर्थात पीटर पार्करचा रोल सर्वप्रथम टॉब मॅग्वायरने केला होता. त्यानंतर पुढच्या दोन सिनेमांमध्ये गारफिल्ड स्पायडर मॅन बनला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.