ब्रिटिश गायिका एडेल सिनेमात करणार अभिनय प्रसिद्ध ब्रिटिश गायिका आणि गीतकार एडेलचा आज 33 वा वाढदिवस आहे. एडेलच्या नवीन अल्बमची हजारो चाहते वाट बघत असतात. तिने आतापर्यंत 22 बिलबोर्ड म्युझिक ऍवॉर्ड जिंकले आहेत. ‘समवन लाइक यू’, ‘रोलिंग इन द डीप’ और ‘सेट फायर टू द रेन’ सारखी तिने गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत.
एकदा ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या गाण्यांमध्ये एक आर्त वेदना दिसून येत असते. यामुळेच तिच्या अल्बमना आतापर्यंत लाखोंचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता एडेलने अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचा निर्णय घेतला आहे. तिने स्वतःचा लूक बदलायचे ठरवले आहे, असेही समजते आहे.
कारण सोशल मीडियावर ती अपलोड करत असलेल्या तिच्या फोटोंमध्ये तिच्यात आमूलाग्र बदल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तिच्या लूकमधील बदलांमुळे ती ऍक्टिंग असाईन्मेंट करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिने अद्याप त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण तसे झाले,तर तिच्या फॅन्ससाठी ही खूषखबर असेल.