नवी दिल्ली : भारतीय अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी रात्री उशिरा जोरदार भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 मोजली गेली आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने, ‘भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर असल्याचे सांगितले आहे.
तर तिकडे अफगाणिस्तानमध्येही काल संध्याकाळी भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी मोजली गेली आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी सकाळी 8.46 वाजता येथे भूकंप झाला होता. त्यानंतर ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
Earthquake of Magnitude:5.8, Occurred on 29-07-2023, 00:53:47 IST, Lat: 10.75 & Long: 93.47, Depth: 69 Km ,Location: Andaman Islands, for more information Download the BhooKamp App https://t.co/MKHCpo5N3Y @ndmaindia @Indiametdept @KirenRijiju @Dr_Mishra1966 @DDNewslive pic.twitter.com/WVe9MfROeU
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) July 28, 2023
अरुणाचल प्रदेशात शुक्रवारी सकाळी 8.50 च्या सुमारास भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, अरुणाचल प्रदेशातील पैंगीनच्या उत्तरेला भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. यापूर्वी 22 जुलै रोजी अरुणाचलच्या तवांगमध्ये 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.