बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. उर्वशी वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच उर्वशीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये ती निळा क्रॉप टॉप आणि लुंगी अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला उर्वशीने कॅप्शन दिले, “लुंगी व्हेकेशन, लुंगी वन साइज फिट्स ऑल’. या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
उर्वशीच्या लुंगी आणि क्रॉप टॉप या लूकला अनेकांनी ट्रोल केले आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी शिंकताना दिसते. त्यामुळे एका नेटकऱ्याने, “करोना झाला आहे का?’, अशी कमेंट केली. तर एकाने कमेंट करत लिहिले, “हे काय सुरू आहे’. उर्वशीच्या या व्हिडीओला 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास उर्वशी लवकरच “ब्लॅक रोज’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच उर्वशी “इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सिरीजमध्ये देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये अभिनेता रणदीप हुडा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.