मुंबई – बॉलीवूडमधील बिग बॅनर प्रॉडक्शन हाऊस असलेल्या यशराज फिल्म्सकडून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेबसिरीज सुरू केली जाणार असल्याचे समजले होते. त्या बिग बजेट वेबसिरीजची घोषणा आता झाली आहे.
“वायआरएफ एन्टरटेनमेंट’च्या बॅनरखाली या वेबसिरीजची निर्मिती केली जाणार आहे आणि त्याचे नाव “द रेल्वे मेन’ असे असणार आहे. या वेबसिरीजचा फर्स्ट लूक आणि टीजर शेअर केला गेला आहे. ही वेबसिरीज 1984 मध्ये भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेच्या काळात काम केलेल्या काही गुमनाम हिरोंच्या कामगिरीवर आधारलेली आहे.
या गुमनाम हिरोंनी या आपत्तीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. ही वेबसिरीज आणखीन बरोबर एक वर्षाने म्हणजे 2 डिसेंबरला स्ट्रीम केली जाणार आहे. के. के. मेनन, आर. माधवन आणि इरफान खानचा मुलगा वाबिल खान हे यातील लीड रोलमध्ये असणार आहेत.
भोपाळ गॅस दुर्घटनेतील हिरोंना श्रद्धांजली म्हणून आपण या वेबसिरीजमध्ये सहभागी झाल्याचे वाबिल खानने म्हटले आहे. या हिरोंनी 37 वर्षांपूर्वी अनेक जीव वाचवले होते. या हिरोंचा कोठेही उल्लेख झालेला नाही, असे तो म्हणाला.