काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी मुल्ला मुहम्मद हसन अखुंद अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे तर मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हक्कानीलातालिबानने गृहमंत्रीपद दिले आहे. दरम्यान, तालिबानने ज्या व्यक्तीला शिक्षणमंत्र्याच्या पदावर बसवले आहे त्या व्यक्तीने शिक्षणाच्या मुळ उद्देशावर घाव घातला आहे.
अफगाणिस्तानाच्या नव्या तालिबानी सरकारने आपल्या नीती घोषित करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या नवीन शिक्षण मंत्र्यांनी अजब संशोधन करत आजच्या काळात पीएचडी किंवा अन्य कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नाही, असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
शिक्षण मंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर यांच्यानुसार, आज देशात मुल्ला आणि तालिबानचे सरकार आहे. आमच्यापैकी कोणाकडेही कसलीही डिग्री नाहीय, तरी आम्ही महान आहोत. यामुळे आजच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पीएचडी किंवा मास्टर डिग्रीची आवश्यकता नाही.
तालिबानने सत्तेत येताच अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. मुला मुलींच्या वर्गात मध्ये पडदा लावणे, पुरुष शिक्षकांनी न शिकविणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत. तालिबानने देशाच्या लोकांना आश्वासन दिले आहे की, इस्लामिक आणि शरिया कायद्यानुसार शिक्षण क्षेत्राचा विकास केला जाईल. अद्ययावत शिक्षणासाठीदेखील प्रयत्न केले जातील. देशातील हुशार विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारी भीती मनात बाळग नये असे सांगितले आहे.