मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही सिनेइंडस्ट्रीतील उभरती स्टार मानली जाते. अनेकदा ती तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकते. सारा खूपच उत्स्फूर्त आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील याची साक्ष देतात. सारा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि तिचे चाहते देखील अभिनेत्रीच्या या फोटो आणि व्हिडिओला नेहमीच पसंती देत असतात.
दरम्यान, आता सारा आपल्या एका व्हिडिओमुळे चांगलीच ट्रोल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलंच सुनावलं आहे. सारा अली खान हिचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ विमानतळावरील आहे. यामध्ये दिसत आहे की, सारा अली खान ही विमानतळावर स्पाॅट झालीये. मात्र, पापाराझी आणि चाहत्यांना पाहून चक्क सारा अली खान ही पळताना दिसत आहेत. आता व्हिडीओमुळेच अभिनेत्री ट्रोल होताना दिसत आहे.
Sara Ali Khan. 🔥🥵 pic.twitter.com/uopV64NZ0G
— 🫶𝙌𝙃𝘿❤️🔥 (@QHDposts) April 19, 2023
एकाने नेटकाऱ्याने म्हटले की, ‘या स्टार किड्सला इतका जास्त भाव देऊ नका यार…कशाला एवढा भाव देता…’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘असे काय झाले हिला विमानतळावर पळायला. हिच्याकडे सर्वांना दुर्लक्ष करा…इतका भाव कशाला.” अश्या अनेक कमेंट नेटकरी या व्हिडिओवर करताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्राउजर परिधान केली आहे.
सारा अली खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, ‘आशिकी 3’ चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान हिला आशिकी 3 चित्रपटाची आॅफर मिळालीये. मात्र, याकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.