“स्टुडंट ऑफ द ईयर 2′ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडेचे आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर फक्त 2 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. परंतु आतापासूनच बॉलीवूडमधील
आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गनना केली जात आहे. अभिनेत्री होण्यापूर्वीपासूनच सोशल मीडियावर अनन्याची जबरदस्त फॅलो फॉलोव्हिंग आहेत.
अनन्या पांडे अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अनन्याने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे, जे सध्या खूपच व्हायरल झाले आहे. अनन्या पांडेची हे फेटो खूप ग्लॅमरस आहेत.
फ्लूरोसंट कलर वन पीस ड्रेसमध्ये अनन्याचे सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे. या फोटोंमध्ये अनन्या तिचा फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अनन्याच्या या छायाचित्रांना चाहत्यांनी खूप पसंती केले आहे,
अवघ्या काही तासांतच 10 लाखाहून अधिक लाईक्स त्याच्यावर आल्या आहेत.
दरम्यान, अनन्या सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास अनन्या लवकरच ईशान खट्टरसोबत “खाली पीली’या
चित्रपटात दिसणार आहे.