अबुजा (नायजेरिया) – नायजेरियातील दक्षिणेकडील इमो नावाच्या प्रांतातील एका बेकायदेसीर तेल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये झालेल्या स्फोटात किमान 100 जणांचा मृत्यू झाला आहे. इगबेमा या भागातील एका बेकायदेशीर पणे चालवण्यात येणाऱ्या तेल शुद्दीकरण प्रकल्पामध्ये हा स्फोट झाला. हा भाग इमो आणि रिव्हर्स या दक्षिणेकडील प्रांतांच्या सीमाभागामध्ये आहे, असे अधिकारयांनी सांगितले.
या तेल शुद्दीकरण केंद्रातील बंकरमध्ये आग लागल्यामुळे किमान 100 जण होरपळले. हे सर्वजण ओळखण्यापलिकडे जळून गेले आहेत, असे इमो प्रांतातील पेट्रोलियम साधन संपत्तीचे आयुक्त गुडलक ओपियाह यांनी सांगितले.
या बेकायदेशील तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या मालकाला सरकारने यापूर्वीच वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे. हा मालक आताही फरार आहे. हा स्फोट इमो आणि रिव्हर्स या प्रांतांदरम्यानच्या जंगलांमध्येही ऐकू गेला होता. घटनास्थळी पूर्ण जळालेल्या अवस्थेतील 108 मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत.
तेल कंपन्यांमधील चोरीच्या तेलावर प्रक्रिया करून ते तेल काळ्या बाजारात विकण्याचे धंदे नायजेरियामध्ये मोट्या प्रमाणावर चालतात.