मुंबई – आयपीएल IPL 2022 चा 37 वा सामना आज खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्सने मुंबईसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या.
लखनौसाठी केएल राहुलने शतक झळकावले आणि 62 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. याव्यतिरिक्त मनिष पांडेने 22, आयुष बदोनीने 14, क्विंटन डी कॉकने 10 आणि दीपक हुड्डाने 10 धावा केल्या.
केएल राहुलचे 61 चेंडूत शतक
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने 61 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने षटकारासह मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याने दोन्ही शतके मुंबईविरुद्धच झळकावली. एका हंगामात एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा तो कोहलीनंतरचा दुसरा खेळाडू आहे.
मुंबई इंडियन्सकडून कायरन पोलार्ड आणि रायली मेरेडिथने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह आणि डेनियल सैम्स प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स या मोसमातील पहिला विजय मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पाचवेळा चॅम्पियन मुंबईने सातही सामने गमावले असून ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, लीगमधील नवीन आणि सर्वात महागड्या संघ लखनऊ सुपर जायंट्ससाठी आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे. त्यांनी सातपैकी चार सामने जिंकले असून ते पाचव्या स्थानावर आहेत. मात्र, लखनौला गेल्या तीन सामन्यांत दोन पराभव पत्करावे लागले आहेत.