टोकियो – जपानच्या उत्तरेकडील राष्ट्रीय उद्यानात एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये 26 जण होते. बुडालेल्या बोटीमधून आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह सापडले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर इतरांचा शोध सुरू आहे.
ही बोट बुडायला लागल्यावर मदतीचा संदेश पाठवण्यात आला होता. त्यानंतर तटरक्षकांची मदत घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत ही बोट समुद्रात बुडाली होती. आतापर्यंत ज्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये 7 पुरुष आणि 3 महिला आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोटीमध्ये एकूण 24 प्रवासी आणि दोन कर्मचारी असे मिळून एकूण 26 जण होते. प्रवाशांमध्ये 4 लहान मुलेही होती. शिरोटोको द्विपसूहाजवळ सफरीसाठी गेली असता ही बोट बुडायला लागली होती. या किनाऱ्याजवळ अत्यंत खडकाळ जमीन आहे. त्यामुळे तेथून नौका चालवणे खूपच अवघड असते. या खडकाळ किनाऱ्यामुळेच ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली असावी, असा अंदाज आहे.
या बोट नाहतुकदाराच्या बोटींचे गेल्या वर्षी दोन वेळा अपघात झाले होते. त्या संदर्भात तपास करण्याचे आदेश परिवहन मंत्रालयाने दिले आहे.