लंडन – अफगाणिस्तानमधून सुटका करून घेण्यासाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या विमानातच एका अफगाण महिलेची प्रसुती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तुर्की विमानातील कर्मचारी महिलांनी समन नूरी या 26 वर्षे वयाच्या युवतीला प्रसुतीसाठी मदत केली आणि विमानातच तिच्या कन्येचा जन्म झाला.
सोमन नूरी आणि तिच्या पतीला अफगाणिस्तानातन दुबईला नेले गेले होते. त्यानंतर ब्रिटनमधील स्थायी वास्तव्यासाठी या दाम्प्÷याला दुबईवरून बर्मिंगहॅमला नेण्यात येत होते. विमानाने धावपट्टीवरुन उड्डाण केले त्याचवेळी सोमन नूरी हिला प्रसववेदना सुरू झाल्या होत्या.
त्यानंतर विमानातील कर्मचारी महिलांच्या मदतीने नूरी याची प्रसुती करण्यात आली. हे सावधगिरीचा उपाय म्हणून विमान कुवेतमध्ये उतरले. त्यानंतर आई आणि नवजात आपत्याची तपासणी केली गेली. दोघेही पुरेसे सुखरुप असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना ब्रिटनला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवजात बालिकेचे नाव “हवा’ असे ठेवण्यात आले. या शब्दाचा अर्थ “संध्याकाळ’ असा होतो.
यापूर्वीही 26 ऑगस्टला अमेरिकेच्या लष्करी विमानात अशाच प्रकारे एका कन्येचा जन्म झाला होता. जर्मनीतील अमेरिकेच्या लष्करी तळावर जात असताना प्रवासी महिलेला प्रसववेदना होऊ लागल्या होत्या. याहीवेळी विमानातील कर्मचारी महिलांनी ही प्रसुती केली. नवजात कन्येचे नाव रिच असे ठेवण्यात आले होते.