नवी दिल्ली : दुचाकीला झालेल्या एका अपघातानंतर तब्बल सात महिने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एका महिलेने एका सुदृढ मुलीला जन्म दिला असून या आरोग्यविषयक चमत्काराने डॉक्टरही हैराण झाले आहेत. या बालिकेची तब्येत अतिशय चांगली असून त्या मातेला मात्र अद्याप आपण एका मुलीला जन्म दिला याची कोणतीही जाणीव नाही
अपघातानंतर बेशुद्ध झालेल्या या महिलेचे फक्त डोळे उघडतात मात्र ती बोलू चालू शकत नाही. आसपास काय घडले हे सुद्धा तिला कळत नाही. 7 महिन्यापूर्वी शफिया नावाची ही महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून चालली होती, तेव्हा ती 40 दिवसांची गर्भवती होती. तेव्हा त्यांच्या दुचाकीला जोरदार अपघात झाला आणि त्यामध्ये शफिया जखमी झाली. तेव्हापासून ती रुग्णालयातच दाखल होती.
अपघातनंतर तिला जोरदार मार बसल्याने तिची शुद्ध हरपली होती आणि ती गेले सात महिने शुद्धीतच नव्हती तीच्या पोटातील गर्भ मात्र वाढत होता. कालावधी पूर्ण झाल्यानंतर तिने नैसर्गिकरित्या या मुलीला जन्म दिल्याने डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा आपल्या 22 वर्षांच्या करिअरमध्ये अशा प्रकारची केस आपण पाहिले नव्हती याची कबुली दिली आहे.
त्यामध्ये कोणताही चमत्कार नसून गेल्या सात महिन्यांमध्ये डॉक्टर्सनी तिची चांगली काळजी घेतल्यानेच गर्भही व्यवस्थित वाढला. हा अपघात झाला होता तेव्हा शफिया या अपघातातून वाचण्याची फक्त दहा टक्के शक्यता होती पण डॉक्टर्सनी प्रयत्नाची पराकाष्टा करून तिचा जीव वाचवलाच शिवाय तिच्या पोटातील गर्भाचा जीव वाचवला आणि दिवस पूर्ण होताच सुदृढ अशा बालिकला ही जन्म दिला.
शाफियाचे लग्न झाल्यानंतर दीड महिन्यातच अपघात झाला होता. पती हैदर सोबत दुचाकीवरून चालले असताना तिच्या ड्रेसचा दुपट्टा चाकामध्ये अडकला आणि ती जोरात खाली पडली जोरदार मार लागल्याने ती बेशुद्ध अवस्थेत गेली 31मार्चला हा अपघात झाला होता तिच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा ज्या काही चाचण्या करणात आला त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे लक्षात आले.
तेव्हा डॉक्टर्सनी विशेष काळजी घेऊन उपचारांना प्रारंभ केला गर्भ फक्त 40 दिवसांचा असल्याने कायद्याप्रमाणे गर्भपात करणे शक्य होते पण सोनोग्राफीनंतर गर्भाची अवस्था अतिशय चांगली असल्याचे लक्षात आल्याने पती हैदरने सुद्धा गर्भपात करू नये अशी विनंती केली.
सात महिन्यांच्या कालावधीमध्ये हैदरने आपल्या पत्नीची चांगली काळजी घेतली त्याचेच फलित म्हणून आता या दांपत्याला एक सुदृढ बालिका झाली आहे आपली पत्नी शफिया कधी शुद्धीवर येते आणि आपण तिला बाळाच्या जन्माची कधी बातमी देतो याची उत्सुकता लागली आहे पण शफिया कधी शुद्धीवर येते याबाबत डॉक्टरनाही काही सांगता येत नाही आणखी काही उपचारही नजीकच्या कालावधीमध्ये शफियावर केले जाणार आहेत.