मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या ९३ वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला. लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर या परिवारात झाला होता.
लतादीदींच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शोक व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांचं निधनानंतर 2 दिवसांचा दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी देखील शोक व्यक्त केले आहे.
अमृता फडणवीस यांचे ट्विट
लता मंगेशकर यांच्या निधनानं पोकळी निर्माण झाली आहे.
Heartfelt tributes to the Immortal Pride of India – The Nightingale of India – she has left a huge vaccum in our hearts !
May her soul Rest In Peace 🙏#omshanti #LataMangeshkar— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2022