Big Boss 17 : ‘बिग बॉस १७’ आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहचला आहे. या शोमधील पाच टॉप स्पर्धकांमधून एक विजेता म्हणून समोर येणार आहे. विशेष म्हणजे या टॉप पाच स्पर्धकांमध्ये अभिनेता अंकिता लोखंडेचा देखील समावेश आहे. इतकेच काय तर या शोची विजेती अंकिता लोखंडे होणार असल्याची देखील चर्चा होत आहे. यानंतर आता या शोमध्ये अमृता खानविलकर अंकिताला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे. अमृता अंकिताची खास मैत्रीण आहे. अनेकदा तिने सोशल मीडियाद्वारे देखील अंकिताला पाठिंबा दिला आहे.
अंकिताच ट्रॉफी जिंकेल असा विश्वासही अमृताला आहे. आता ती बिग बॉस १७ च्या घरात लाडक्या मैत्रिणीला पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी येणार आहे. याआधी अंकिताला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री रश्मी देसाई येईल, असे बोलले जात होते. मात्र शेवटच्या क्षणी तिचे येणे रद्द झाले असून आता अमृताची बिग बॉसमध्ये एंट्री होणार आहे. अंकितासह इतर स्पर्धकांनाही पाठिंबा देण्यासाठी काही सेलिब्रिटी बिग बॉस १७ च्या घरामध्ये येणार आहेत.
समोर आलेलल्या माहितीनुसार, अभिनेता करण कुंद्रा मुनव्वरला पाठिंबा देण्यासाठी येईल. करण सुरुवातीपासूनच मुनव्वरला पाठिंबा देत आहे. करण आणि मुनव्वर यांना कंगनाच्या ‘लॉकअप’ शोमध्ये एकत्र आले होते. तर अभिनेत्री पूजा भट्ट मन्नाराला, अरुणला पाठिंबा देण्यासाठी निर्माता-अभिनेता संदीप सिकंद आणि शालीन भनोट हा अभिषेक कुमारला पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचे म्हंटले जात आहे.