Ankita Lokhande| अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसनंतर ‘स्वतंत्रवीर सावरकर’ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करत आहे. अशातच आता अंकिताच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. अंकिताने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर केली आहे. निर्माता संदीप सिंगच्या नव्या वेबसीरिजमध्ये अंकिता आम्रपालीची भूमिका साकारणार आहे.
निर्माता संदीप सिंगने या सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “अंकिता लोखंडेच्या रूपात आम्ही सादर करत आहोत सामर्थ्य, मोहकता आणि दृढतेचे प्रतीक असणारी आम्रपाली… ही मनमोहक मालिका शाही नगरवधूच्या न सांगितल्या जाणाऱ्या गाथेचा अभ्यास करते, तिच्या भावना आणि आव्हानांनी भरलेला प्रवास सांगते.” Ankita Lokhande|
दरम्यान, बौद्धकालीन इतिहासात उल्लेख असलेली वैशालीनगर राज्याची नगरवधू आम्रपालीची जीवनकहाणी या वेब सिरीजमधून उलगडणार आहे. पहिल्यांदाच आम्रपाली या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची कथा वेब शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधील अंकिताचा लूक अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
स्वतंत्रवीर सावरकर या सिनेमात अंकिताने साकारलेल्या यमुनाबाई यांच्या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता आम्रपाली या भूमिकेत अंकिता दिसणार आहे. या नव्या आणि वेगळया भूमिकेत अंकितला पाहण्यासाठी चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा: