Amol Kolhe Offer On Nilesh Lanke : महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत मुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर नंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन वेगळे गट तयार झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पक्षाचं घड्याळ चिन्हंदेखील अजित पवार यांच्या गटाला मिळालं आहे. पक्षात फूट पडून दोन गट झाल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे. दोन्ही गटातील नेते आता एकमेकांवर तीव्र टीकाटिप्पणी करत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. । Amol Kolhe Offer On Nilesh Lanke
त्याचवेळी अमोल कोल्हे अजित पवार यांच्या लोकांना आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी थेट ‘आमच्याकडे या… खासदार करतो…’ अशी ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
अजित पवार गटातले आमदार निलेश लंके यांची शरद पवार यांच्यांशी जवळीक वाढू लागल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी अमोल कोल्हे यांनी लंके यांना खुली ऑफर दिली आहे.
अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चार दिवस चाललेले या महानाट्याच्या समारोप कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी आमदार निलेश लंके यांना शरद पवारांसोबत येण्याचं ऑफर दिलीय.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, “तुतारी घेऊन नगर दक्षिण मतदार संघात लढण्याचा आवाहन अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना केले आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असे कोल्हे यांनी म्हटलंय.
तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिण मध्ये वाजवलीच पाहिजे.’असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. । Amol Kolhe Offer On Nilesh Lanke