मुंबई : राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नाही तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले होते.यामध्ये डॉ.अमोल कोल्हे आणि सुनील तटकरे यांचा सहभाग होता. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार याना पहिला धक्का बसला आहे. कारण त्यांच्या सोबत गेलेल्या अमोल कोल्हेंनी त्यांची साथ सोडली आहे.
अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर असणारे शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
अमोल कोल्हे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत” असे म्हटले आहे.
अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अमोल कोल्हे काल राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचे म्हटले जात होते. मात्र आज त्यांनी मी साहेबांसोबत असल्याचे ट्वीट केले आहे. अमोल कोल्हे यांच्या घरवापसीने आता अजित पवार यांना पहिला धक्का बसला असल्याचे समोर आले आहे.