मुंबई – बिग बी, महानायक, शहेनशहा या विशेषणांनी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमधील यंदा 50 वर्षांची कारकिर्द पूर्ण केली आहे. 50 वर्षांपूर्वी “सात हिंदुस्थानी’ हा अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा 15 फेब्रुवारीला रिलीज झाला होता.
View this post on Instagram
‘ मशहूर होने का शौक़ नहीं मुझे ; आप मुझे पहचानते हैं बस इतना काफ़ी है ‘ ~ HRB, पूज्य बाबूजी
या 50 वर्षांची कारकिर्दत दर रविवारी अमिताभ आपल्या चाहत्यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी ते करोना विषाणूमुळे घराबाहेर पडणार नाहीत.
याबाबत अमिताभ बच्चन इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे. “मशहूर होने का शौक़ नहीं मुझे; आप मुझे पहचानते हैं बस इतना काफ़ी है” असा संदेश त्यांनी आपल्या चाहत्यांना या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. पुढील काही दिवस माझ्या बंगल्यासमोर गर्दी करु नका” असं अमिताभ म्हणाले आहेत.