नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या बैठकीसाठी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तेलंगणा दौऱ्यावर येणार होते परंतु त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी शनिवारी सांगितले.
काही तातडीच्या कामामुळे शाह यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. शहा रविवारी हैदराबाद, करीमनगर आणि महबूबनगर येथे तीन महत्त्वाच्या सभांना हजेरी लावणार होते, त्यातून लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील भाजपची तयारी सुरू होणार होती.
ते रविवाी दुपारी १.३० वाजता महबूबनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार होते, त्यानंतर दुपारी 4 वाजता करीमनगरमध्ये मतदान केंद्र समितीची बैठक आणि हैदराबादमध्ये संध्याकाळी ६ वाजता सिकंदराबाद मतदारसंघातील व्यावसायिकांच्या अधिवेशनात सहभागी होणार होते.