Patna Pirates vs Puneri Paltan, Pro Kabaddi League 2024, Patna : प्रो कबड्डी लीग सीझन 10 च्या पटना लेगमध्ये आज दोन सामने खेळले गेले. मोसमातील 91 वा सामना पाटणा पायरेट्स आणि पुणेरी पलटण यांच्यात झाला. हा रोमांचक सामना 32-32 असा बरोबरीत सुटला.
पटना के हुनरबाज़ और पुणेरी सेना के बीच मुक़ाबला हुआ टाई ⚔️
इस रोमांचक मैच में किस रेड ने जीता आपका दिल❓ #ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #PATvPUN #PatnaPirates #PuneriPaltan pic.twitter.com/PA2lFq2esy
— ProKabaddi (@ProKabaddi) January 27, 2024
ही मोसमातील 7वी बरोबरी होती. हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर तेलुगू टायटन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाटणा पायरेट्सविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर पुणेरी पलटण अव्वल स्थानावर पोहोचले आहे.
पूर्वार्धात 4 गुणांची आघाडी असलेल्या पुणेरी पलटणला उत्तरार्धात पाटणा पायरेट्सचे आव्हान पेलता आले नाही आणि पटनाने झटपट आघाडी घेत सामना बरोबरीत सोडवला. शेवटी पुणेरी पलटणने पटकन गुण मिळवत सामना बरोबरीत सोडवला. या मोसमातील हा 7वा सामना बरोबरीत सुटला.