मुंबई – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरून सुरू असलेल्या गदारोळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज मुंबई दौरा केला. मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत. त्याआधी त्यांनी लालबाग राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले.
अमित शहा हे लालबाग राजाच्या (Lalbaugcha Raja) मंडळात दाखल होण्यापूर्वीच परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, त्यांच्या सुरक्षितेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. यावेळी भाविकांसाठी काही काळासाठी दर्शन बंद ठेवण्यात आलं. सर्व मंडप रिकामा करण्यात आला होता.
दरम्यान, राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असतानाच शहा यांचा हा दौरा झाला. विधानसभा अध्यक्षांकडून कोणताही प्रतिकूल निर्णय आल्यास भाजपा प्लॅन-बी लागू करू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत भाजपाला निवडणुकीसाठी रणनीती आखून पुढे जायचे आहे. त्यामुळे हा दौरा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.