पुणे – आंबिल ओढा परिसरातील नागरिकांच्या घरांवर आज सकाळी महापालिकेनं बुलडोजर चालवला. या कारवाईवरून स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस आमनेसामने आले होते. मात्र, स्थानिकांचा विरोध बाजूला सारत महापालिकेनं पाडापाडी सुरूच ठेवली होती. या कारवाईविरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने या प्रकरणी याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे.
या कारवाई विरोधात काही स्थानिक नागरिकांनी वकिलांच्या मार्फत पुणे न्यायालयात आव्हान दिलं. यावर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.
‘हे लोक विस्थापित होणार आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्याचं कोणतंही रेकॉर्ड न्यायालयासमोर नाही, त्यामुळे लोकांना उद्ध्वस्त करणं उचित ठरणार नाही, त्यामुळे या लोकांचं जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेच्या पाडापाडीच्या कारवाईला स्थगिती देत आहोत. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असेल,” असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या :
आक्रोश! पुण्यातील आंबील ओढा परिसराचा वाद नेमका काय आहे? वाचा सविस्तर
#Video : ‘पोलीस काकांनी माझ्या घरांच्या ना मारलं… माझ घर पाडलं, आम्ही कुठे जायचं?’
पुणे! आंबील ओढा कारवाई; १०० हुन अधिक जण पोलिसांच्या ताब्यात
“वेळोवेळी नोटिसा देऊन आम्हीच केली कारवाई”; आंबिल ओढा कारवाई प्रकरणी पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण