#Video : ‘पोलीस काकांनी माझ्या घरच्यांना मारलं… माझ घर पाडलं, आम्ही कुठे जायचं?’

चिमुकल्याचा सरकारला ​सवाल

पुणे – शहरातील दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढा वसाहत सर्व्हे नंबर 133 ही पालिका घोषित झोपडपट्टी पाडण्यासाठी हजारो पोलिस दाखल झाले आहेत. यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पालिका आणि पोलीस प्रशासन बळाचा वापर करून नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. ही कारवाई सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे, त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलीस धरपकड करत आहेत.

यातच महापालिकेच्या या कारवाईनंतर कृष्णा कसबे नावाच्या एका चिमुकला याने माध्यमांसमोर आपली व्यथा  मांडली आहे.   

‘ या कारवाईत आमच्या माणसांना पोलीस मारहाण केली गेली. पोलीस काकांनी माझ्या घरांच्या ना मारलं… माझ घर पाडलं  आम्ही  कुठं जायचं असा सवाल त्याने सरकारला विचारला आहे. आमच्या माणसांना पोलीस पकडून घेऊन गेले आहे. अशी माहिती सांगताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले.’

दरम्यान, आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती चिघळली आहे. पालिका मात्र कारवाईवर ठाम असून एका पाठोपाठ एक जेसीबी इथे पाठवले जात आहेत. 

पावसाळा सुरु असताना महापालिकेने जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण सुरु केल्यानं स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यता येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढलं आहे.

आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट पुणे महापालिकेच्या मालकीचा असून इथल्या रहिवाशांना केदार बिल्डर्सकडून अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही महापालिकेची जागा असली तरी महापालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचं नागरिकांनी सांगितले आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे इथे राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्न न करता महापालिकेकडून ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.

संबंधित बातम्या

मोठी बातमी : पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; नागरिकांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

आक्रोश! पुण्यातील आंबील ओढा परिसराचा वाद नेमका काय आहे? वाचा सविस्तर

पुणे! आंबील ओढा कारवाई; १०० हुन अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.