पिरंगुट – मुळशीत आज दारू विक्री दुकाने सुरू होणार असल्याचे समजल्याने तळीरामांनी सकाळपासून दुकानासमोर गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणावर रांग लागली होती. काल रात्रीपासून दारू विक्री दुकाने सुरू होणार असल्याचे अनेकांना समजले.
तालुक्यात भूगावजवळ, पिरंगुट, हिंजवडी, बावधन भागात वाइन्स शॉप आहेत. या दुकानांसमोर सकाळपासून पिशव्या घेऊन तळीरामांनी हजेरी लावली होती.
मात्र आज या दुकान दारांना कोणतेही अधिकृत पत्र व माहिती मिळाली नसल्याने ही दुकाने उघडली नाहीत. त्यामुळे अनेक हौशी व रांगेत उभे असलेल्यांचा हिरमोड झाला.