बेल्हे (प्रतिनिधी) – आळेफाटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जाधववाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी मंगळवार (दि.२१) आळेफाटा पोलिसांनी गावठी दारू बनणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून दबंग कारवाई केली.
एका आठवड्यात ही दुसरी पोलिसांची करावी असल्यामुळे आळेफाटा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सध्या करोनाचा संसर्ग वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये आळेफाटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस स्टेशन मुजावर यांनी अवैद्य धंद्यायांकडे लक्ष देऊन जाधववाडी (ता.जुन्नर) येथील गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्या बरोबर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन खात्री केली असता कुकडी नदीपात्रालगत २ हजार लीटर च्या ४ टाक्या व इतर प्लास्टिक तसेच लोखंडी १५ ब्यालर असे सुमारे १२ लाख ७६ हजार रुपये किमतीची हातभट्टी दारू लागणारे रसायन आढळून आले.
ही सर्व रसायने पोलिसांनी जप्त केले असून साहित्य नष्ट केले. या प्रकरणी संबंधितांवर मुंबई पोलीस दारू अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी दिली.