नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधिश एस.एन.शुक्ला यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश रंजन गोगोई यांनी सीबीआयला आदेश दिले आहेत. शुक्ला यांच्यावर एका खासगी वैद्यकिय महाविद्यालयास फायदा करून देण्याचे काम केले असल्याचा आरोप असून याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
न्यायाधिश एस.एन शुक्ला यांनी एका खासगी वैद्यकिय महाविद्यालयाची नामांकनाची तारीख वाढवून देवून त्यांची मदत केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यासाठी सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालच्या न्यायाधिशाना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांवर कारवाई करण्याची मागणी करणारे एक पत्र लिहीण्यात आले होते. दरम्यान, ही मागणी सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी पंतप्रधानांपर्यंत नेली होती तसेच शुक्ला यांच्यावर संसदेत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती. दरम्यान, या एकाच प्रकरणामुळे नाही तर मागील वर्षात देखील शुक्ला यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रारी आल्या होत्या त्यानुसार न्यायाधिश दीपक मिश्रा यांनीदेखील शुक्ला यांना पदावरून हटवण्याची पंतप्रधानांकडे मागणी केली होती.
.