अनगडशाहवली बाबांच्या दर्ग्यासमोर सर्वधर्मीय एकोपा

दीपोत्सव : पंचक्रोशीतील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूत सुमारे साडेतीनशे वर्षां पूर्वीपासून असणाऱ्या सर्वधर्म समभाव प्रतीकाचे अनगडशाहवली बाबांचा दर्गासमोर दीपावलीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. मुस्लिम बांधवांनी दीपोत्सव साजरा करीत सर्वधर्म समभावाचा एकोपा निर्माण केला आहे.

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होताना पहिली आरती अनगडशाहवली दर्ग्याजवळ होवूनच पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनगडशाहवली बाबा हे पुणे येथील गुळआळीत वास्तव्यास होत. रिद्धी-सिद्धी प्राप्त असल्याने त्यांना अवलिया बाबा म्हणत.

नगडशाहवली बाबांचे आजही पुणे गुळआळीत दर्गा असून, तेथे चॉंदबीबी बावडी (विहिर) आहे.जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची मंहती वाढत असताना धर्मसत्तातील न्यायनिवाड्याने रामेश्‍वर शास्त्रींनी महाराजांची अभंग-गाथा बुडविण्याचे फार्मन दिल्यानंतर गाथा इंदायणीच्या डोहात बुडविण्यात आले होते. शास्त्री पुण्यात आले आणि गुळआळीतील बावडीत अंघोळ करताना नमाजाचे पाणी दुषित केले म्हणून त्यांना बाबांनी पाणी में डुबते रहो शाप दिला.

शास्त्री पाण्याबाहेर येताच अंगाचे दाह होवू लागले. त्यांच्या शिष्यांनी भिजवल्या वस्त्रांनी आळंदीतील माऊलींच्या समाधीजवळ आणले तेथे त्यांना संत तुकाराम महाराजांची माफी मागण्याचा दृष्टांत झाल्यावर ते माफी मागण्यासाठी देहूत आले आणि माफी मागितल्यावर त्यांचा दाह संपृष्टात आला. ते महाराजांचे शिष्य बनले. त्यांनी महाराजांची आरती लिहिली.

मी दिलेला शाप कोणी संपृष्टात आणला या जिज्ञासापोटी बाबा देहूत आले. त्यांच्या जवळील कटोऱ्यात भिक्षा मागत देहूत घरोघरी फिरले; मात्र त्यांचा कटोरा कोठेच भरला नाही. महाराजांची पत्नी जिजामाई दळण दळताना कन्या भागीरथीने चिमूटभर भरलेले हातातील पीठ कटोऱ्यात टाकताच कटोरा भरला, असे अख्यायिकेतून समोर आले आहे.

बाबांना दृष्टांत होत महाराजांचे ते शिष्य बनले आणि देहूच्या सीमेवरील कापूर ओढ्यालगतच्या घनदाट झाडी असणाऱ्या (आंबाचे बन) अंधेरी बागेत बाबा व त्यांचे शिष्य गुलाबशाहवली बाबा वास्तव्य करू लागले. याच बनात श्री विठ्ठल-रखुमाईची स्वयंभू मूर्ति आढळल्यावर मुख्य मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. नमाजासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी तेथे एक बावडी निर्माण केली. त्यास चॉदबिबि बावडी म्हणतात आणि त्यातील पाण्याने आजार बरे होत असल्यांची अख्यायिका आहे.

बाबांच्या देहासनानंतर तेथे बांबाची दर्गा बांधण्यात आली.सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या या दर्ग्यासमोर जगद्‌गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होताना पहिली आरती होवूनच पालखी सोहळा तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होते. पंचक्रोशीतील हिंदू, मुस्लिम बहूजन समाज बाबाच्या दर्शनार्थ दर्ग्यात येतात. चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी जगाला दिलेला सर्वधर्म समभावाचा संदेश आजही पालखी सोहळ्याच्या आरतीतून दिसून येत असते, तर मुस्लिम बांधवाकडून दीपावलीचा सण साजरा करताना दीपोत्सव साजरा करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.