fbpx

प्रभुदेवा अडकला लग्न बेडीत

ऍक्‍टर, डायरेक्‍टर आणि कोरिओग्राफर प्रभुदेवा पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत आहे. प्रभुदेवान 1995 मध्ये रामलता बरोबर लग्न केले होते. दोघांना 3 मुलेही झाली आहेत. त्यापैकी मोठ्या मुलाचा 2008 मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला. तेंव्हापासून प्रभुदेवा आणि त्याच्या पत्नीमध्ये बेबनाव व्हायला सुरुवात झाली होती.

प्रभुदेवाने 2011 मध्ये आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. दक्षिण भारतातील ऍक्‍ट्रेस नयनतारामुळे प्रभुदेवाचा घटस्फोट झाला होता, असे बोलले जाते आहे. आता त्याने पुन्हा एकदा सूत जुळवायला सुरुवात केली आहे. त्याची पार्टनर   स्वतःचीच भाची आहे,  अशी चर्चा असतानाच मीडिया अहवालानुसार,  प्रभु देवाने त्याच्या फिजीओथेअरपिस्टशी लग्नगाठ बांधली आहे. सप्टेंबरमध्येच त्याने विवाह सोहळा उरकला असून अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सध्या प्रभुदेवा सलमान खानच्या “राधे’चे दिग्दर्शन करतो आहे. याशिवाय “पोनमोनिकावेल’ या तमिळ सिनेमाचे दिग्दर्शनही तो करतो आहे. “यंग मुंग सुंग’ आणि “बघिरा’ या सिनेमांमध्ये तो काम देखील करतो आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.