चंद्रपूर- चंद्रपूर शहरात एकही कोरोनाबधित रुग्ण आढळला नाही आहे. आज 13 जणांची तपासणी करण्यात आली त्यात एकही रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह नाही मिळाला. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
शहरातील 153 जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते त्यांच्यातील 13 जणांमध्ये लक्षणं कोरोनाची लक्षणं आढळली होती. 14 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
दरम्यान, चंद्रपूर शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील बाहेरून आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्या हातावर शिका आणि घराबाहेर भेटण्यास मनाई असं पत्रकही लावण्यात आले आहे. चंद्रपूरकारांनी लोकडाऊनचं पुरेपूर पालन केले आहे याचा हा पुरावा आहे असेही बोलले जात आहे.