आलियाला किस करने बोरिंग होते – सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट्‌टने “स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या करियरचा श्रीगणेशा केला होता. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर दोघांच्या कारकिर्दीला चांगली सुरुवात झाली. आज सांगायचे झाल्यास आलियाने खूप मोठा पल्ला गाठला आहे; परंतु सिद्धार्थची गाडी अजूनही प्लॅटफॉर्मवरच असल्याचे दिसते. त्याचे मागील काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

“स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटानंतर सिद्धार्थ आणि आलियाची जवळीकता वाढली होती. तेव्हा दोघांचाही रोमांस खूपच चर्चेत होता. दोघांना अनेकवेळा एकत्रित स्पॉट करण्यात आले होते. एका मुलाखतीत सिद्धार्थने सांगितले होते की, आलियाला किस करने बोरिंग होते. ही गोष्ट त्याने “स्टुडंट ऑफ द इयर’च्या शूटिंगनंतर सांगितले होते, ज्यात दोघांचे किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता.

दरम्यान, आलिया सध्या रणबीर कपूरला डेट करत आहे, तर दुसरीकडे सिद्धार्थ हा कियार आडवाणीसोबत रोमांस करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.