मुबई- अभिनेत्री आलिया भटच्या इंस्टाग्रामवर 50 मिलीयन फॉलोवर्स झाले आहे. त्या निमित्ताने तिने फोटो शेअर करत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहे. त्यातच तिने ट्रोलरला सडेतोड उत्तरंही दिले आहे.
आज कौतुकाचा दिवस आहे. त्यामुळे माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे आभार मानते ज्यांच्यामुळे माझ्या चाहत्यांची संख्या ५० मिलियनवर पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये मी फार काही शिकली आहे. सोशल मीडिया आपल्याला एकत्र बांधून ठेवतो. आपल्याला उत्साहित ठेवतो. पण त्यामध्ये आपण कोठेच नसतो. असं तिने लिहिलं आहे.
आपल्या आयुष्यात नात्यांचे महत्त्व फार आहे. पण यामध्ये स्वतःला ओळखणं, स्वतःवर प्रेम करणं तितकच महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर एक लाईक किंवा डियलाईकचं बटण दाबलं की आपलं महत्त्व कमी होत नाही, असंही ती म्हणाली.
दरम्यान, तिच्या सडक या चित्रपटाला नेटकऱ्यांनी डिसलाईकचा पाऊस पाडला होता. त्यानंतर त्या चित्रपटावरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.