मंडारीन भाषा शिकून घ्या- पॉम्पेओ

वॉशिंग्टन- मंडारीन भाषेशी संबंधित अभ्यास वाढवण्यात यावा, अशी सूचना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी विदेश मंत्रालयाला केली आहे. त्याचबरोबर रशियन, हिंदी, अरेबिक आणि फारसी या विदेशा भाषांचाही अभ्यास वाढवण्यात यावा, अशी सूचनाही पॉम्पेओ यांनी केली आहे. अमेरिकेतील नागरिकांनी या विदेशी भाषांचा अभ्यास अधिक वाढवा, असे त्यांनी म्हटले आहे.

“चायनीज कम्युनिस्ट पार्टी’च्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा आणि इराण पुरस्कृत दहशतवादाचे आव्हान पाहता आपल्याला आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या उदाहरणांचे अनुकरण करायला हवे. म्हणूनच विदेश विभागाने मंडारीनसारख्या महत्त्वाच्या भाषेचा अभ्यास वाढवावा. रशियन, हिंदी, अरेबिक आणि फारसी या विदेशी भाषांचाही अभ्यास वाढवण्यात यावा, असे पॉम्पेओ यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष ड्‌वाईट इसेनहॉवर यांनी 1950 साली विदेशी भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले होते, त्याची आठवण पॉम्पेओ यांनी करून दिली. विदेशांचे धोरण समजून घेऊन त्यानुसार अमेरिकेचे धोरण निश्‍चित करण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. याच महत्त्वाच्या भाषांच्या अभ्यासाद्वारे अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीला अधिक प्रभावी बनवण्याच्या कामात सहभागी व्हावे, असेही पॉम्पेओ यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोविड-19, व्यापार, हॉंगकॉंगमधील संरक्षण कायदा आणि शिनझियांग प्रांतातील कारवायांच्या मुद्द्यावरून तणाव वाढला आहे. यासंदर्भात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षामध्ये कोणताही भेद नाही. यापूर्वी अमेरिकेने चीनपुढे झुकते धोरण स्वीकारले आहे, ही बाब खरीच आहे, असेही पॉम्पेओ म्हणले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.