मुंबई – बॉलीवूडमध्ये क्यूट ऍण्ड स्टायलिश अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तर चाहत्यांच्या मनावर एक जादूच केलेली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते. त्यामुळे आलिया सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच इंस्टाग्रामवर युजर्सला घायाळ करते तिचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
यातच आलिया भट्टच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठीयावाडी’ आणि आरआरआर या चित्रपटांमुळे तिच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. आलिया लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री गल गॅडोत सोबत काम करणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटांच्या यशानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. 2021 सालचा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये आलिया भट्ट सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय सेलिब्रिटी अभिनेत्री ठरली आहे.
View this post on Instagram
या यादीत टॉप 10 मध्ये अभिनेता रणवीर सिंग, आलिया भट्ट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण या कलाकारांचाही समावेश आहे.तिच्या वर्कफ्रंट बाबत सांगायचं झाल्यास लवकरच तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.