वॉशिंग्टन – करोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉन जगभरात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. तसेच देशातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, करोना विषाणूचे ओमायक्रॉन देशात वेगाने पसरु शकते. त्यामुळे लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले, करोना विषाणूचे ओमायक्रॉन व्हेरियंट अमेरिकेत वेगाने पसरण्यास सुरुवात होईल. अशा परिस्थितीत यापासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण. हा गंभीर आजार टाळता यावा यासाठी सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करावे. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये. यासोबतच लसीकरण झालेल्यांना बूस्टर डोस देण्याचे महत्त्वही त्यांनी सांगितले.
यापूर्वी व्हाईट हाऊसचे उप प्रवक्ते कॅरिन जीन-पियरे यांनी इशारा दिला होता. जीन-पियरे म्हणाले होते की, प्रशासनाने सध्या विशिष्ट प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा लसीकरणावर भर द्यावा. ओमायक्रॉनबाबत संबंधित विभाग योग्य दिशेने काम करत असून अधिकाधिक अमेरिकन लोकांना लसीकरणाबाबत जागरुक केले जात आहे. यासोबतच बूस्टर डोसबाबतही प्रचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.