आळंदी -आळंदी येथून मरकळ, तुळापूर, लोणीकंद फाटा या मार्गावरील रस्ता कॉंक्रिटीकरणामुळे या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही वाहतूक 45 दिवस पूर्ण बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
सोळू, मरकळ, तुळापूर, लोणीकंद फाटा या मार्गावरील लांबीत कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे अवजड वाहतूक किमान 45 दिवस बंद राहणार आहे. येथील वाहनांना पर्याय म्हणून आळंदी – वडगाव घेनंद रा. म. 129, चाकण ते भोसे पिंपळगाव तर्फे खेड, बहुळ, पिंपळे जगताप, शिक्रापूर रा. म. क्रमांक 55 असा पुणे-नगर रस्त्याला जोडणारा रस्ता उपलब्ध आहे. त्यामुळे मरकळ, तुळापूर, लोणीकंद फाटा या महामार्गावरील नागरिकांनी 45 दिवस सहकार्य करावे.