मुंबई – बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आपल्या वेळेच्या नियोजनासाठी आणि वेळेत काम करण्यासाठी ओळखला जातो. अक्षय कुमार वर्षाला साधारण पाच चित्रपट करतो यासह तो दररोज सकाळी लवकर देखील उठतो आणि कामाला लागतो. यावरूनच अक्षयला अनेकदा टार्गेट केले जाते. अक्षय कुमार ४० दिवसांमध्ये त्याचा एक चित्रपट पूर्ण करतो याबाबत अक्षयने एका मीडिया एव्हेंटदरम्यान आपल्या नियमित शेड्युलबाबत भाष्य केलं. याच कार्यक्रमात साऊथ स्टार रामचरण देखील होता त्याने देखील आर आर आर चित्रपटाबाबत आपला अनुभव सांगितला.
रामचरणने यावेळी आर आर आर या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगबाबतचा किस्सा शेअर केला. तो म्हणाला आर आर आर हा चित्रपट इतका भव्यदिव्य होता की त्याच्या ओपनिंग शॉर्टसाठी तब्बल ३५ दिवसांचा कालावधी लागला होता. काही चित्रपट ४० दिवसात पूर्ण होतात अक्षय कुमार त्याचे चित्रपट या कालावधीत पूर्ण करतो. परंतु काही चित्रपटांना जास्त काळ लागू शकतो असं स्पष्ट मत रामचरणने यावेळी मांडले.
लहानपनापासून मला धुळीची ऍलर्जी होती परंतु या चित्रपटासाठी तब्बल ३५ दिवस मी धुळीत काम केल्याचा अनुभव यावेळी रामचरणने सांगितला. तसेच चित्रपटांमध्ये आता बदल करायला हवेत भारतीय चित्रपट आता राज्याच्या सीमा ओलांडून साता समुद्रापार जात असल्याचा अभिमान आहे असही रामचरण यावेळी म्हणाला.