सुरत : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे देखील सुरतमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. मात्र यावेळी त्यांना स्थानिक नागरिकांच्या निषेधाला सामोरे जावे लागले.
रुदरपुरा खाडीच्या रॅलीत असदुद्दीन ओवेसी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर लोकांनी ‘मोदी मोदी’ आणि ‘go back’ च्या घोषणा दिल्या. ओवेसी जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी रुदरपुरा खाडीत पोहोचताच काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली. तसेच ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. ओवेसींच्या दौऱ्याच्या निषेधार्थ त्यांनी सगळीकडे काळे झेंडे फडकावले.
#WATCH | Black flags shown and ‘Modi, Modi’ slogans raised by some youth at a public meeting addressed by AIMIM MP Asaduddin Owaisi in Gujarat’s Surat yesterday pic.twitter.com/qXWzxvUc5V
— ANI (@ANI) November 14, 2022
गेल्या आठवड्यात, एआयएमआयएमच्या प्रवक्त्याने आरोप केला होता की पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी प्रवास करत असलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला होणार आहे. या दिवशी 89 जागांवर मतदान होणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासोबतच संपूर्ण राज्यात आचारसंहिताही जाहीर करण्यात आली आहे.