बॉलीवूडमधील “खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमारचे सोशल मीडियावर लॉकडाऊनमध्येही तब्बल 100 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक या तीन आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलोअर्सची संख्या 100 मिलियन म्हणजेच 10 कोटींहून अधिक झाली आहे. मात्र, अद्याप सर्वाधिक फॉलोअर्सची नोंद अभिनेता सलमान खान याच्या नावावर आहे.
हा आकडा अक्षय कुमारने रविवारी पार केला आहे. अक्षयचे ट्विटरवर 3 कोटी 51 लाख 69 हजार 214, इंस्टाग्रामवर 38 लाख 87 हजार तेरा आणि फेसबूरवर 2 कोटी 60 लाख 25 हजार 204 फॉलोअर्स आहेत. या तीन प्लॅटफॉर्मवर अक्षय कुमारच्या अनुयायांची संख्या आता 10 कोटी 81 हजार 511वर गेली आहे. अक्षय कुमारने हा टप्पा पार करताच सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांनी सेलिब्रेशन करण्यास सुरवात केली आहे.
दरम्यान, सोशल मीडियाच्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर सलमान खान (108 मिलियन) पहिल्या, अक्षय कुमार दुसऱ्या, शाहरुख खान (90 मिलियन) तिसऱ्या, अमिताभ बच्चन (86 मिलियन) चौथ्या आणि हृतिक रोशन (71 मिलियन) पाचव्या स्थानावर आहेत. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान सोशल मीडियावर येणारे पहिल्या सेलिब्रिटींमध्ये आहेत.