मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘अक्षय कुमार’ त्याच्या कामासोबतच उदार स्वभावासाठीही ओळखला जातो. अक्षय नेहमीच कामातून वेळ काढून समाजातील गरजू लोकांना मदत करत असतो. आता अक्षयने ट्रान्सजेंडर्सला मदतीचा हात दिला आहे.
‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा दिग्दर्शक राघव लॉरेंस आणि अक्षय यांनी एकत्र येत चेन्नईमधील तृतियपंथींसाठी घरं साकारण्याचा विडा हाती घेतला आहे. या कामासाठी अक्षयने तब्ब्ल दीड कोटी रूपये दान केले आहेत.
दरम्यान, अक्षयच्या या कामामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय राघव लॉरेंस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षयचे आभार मानले आहेत.
या पोस्ट मध्ये अक्षय कुमार ट्रान्सजेंडर्ससोबत दिसत आहे. “मित्र आणि चाहत्यांनो…, मी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करणार आहे. अक्षय कुमारने भारतातील पहिले ट्रान्सजेंडर होम तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये दान केले आहेत..” असे राघव यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अक्षय कुमार आपल्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात तृतियपंथीच्या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंचना’ चित्रपटाचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ रिमेक असणार आहे. या चित्रपटात अक्षय शिवाय कियारा आडवाणी, तुषार कपूर आणि शबीना खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.