मुंबई – चित्रपट निर्माते अली अब्बास जफर त्यांच्या दिग्दर्शनातील बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटावर काम करण्यास सज्ज आहेत. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि पृथ्वीराज सुकुमारांथे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
नुकतंच अभिनेता अक्षय कुमार याने या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं असून, या चित्रपटात अक्षय सोबत अभिनेता टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर मध्ये टायगर श्रॉफसोबत अक्षय जबरदस्त पोज देताना दिसत आहे. ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ चित्रपटाचा मुहूर्त २१ जानेवारीला मुंबईत झाला.
A film I’ve been most eager to start #BadeMiyanChoteMiyan! Adding to the adrenaline rush is my Chote @iTIGERSHROFF
Hey Chote, you better remember during the shoot that you were born the year I started my career 😜 pic.twitter.com/UnrfitmD4z— Akshay Kumar (@akshaykumar) January 21, 2023
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटाबद्दल ट्विट करत लिहिले की, ‘मला बडे मियाँ छोटे मियाँचे शूटिंग सुरू करताना खूप आनंद होत आहे.’ यानंतर अक्षय कुमार टायगरची थट्टा करत म्हणाला की, ‘तुझा जन्म झाला त्याच वर्षी मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती, हे तू शूटच्या वेळी लक्षात ठेव.’ असं तो म्हणाला.
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा मूळ चित्रपट अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्यावर चित्रित करण्यात आला होता. या दोघांशिवाय या चित्रपटात इतर अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्याचबरोबर माधुरी दीक्षितनेही या चित्रपटात एक विशेष डान्स केला होता.