अकोले – बाजार समिती निवडणुकीत आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शेतकरी समृद्धी मंडळाने 18 पैकी 11 जागा मिळवत बाजार समितीवर आघाडीचा झेंडा फडकवला. माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
बाजार समितीच्या 18 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सुरवातीला पिचड गटाच्या शेतकरी विकास मंडळाने 3 जागा बिनविरोध निवडून आघाडी घेतली होती. मात्र, आज (रविवार) 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आ. डॉ.लहामटे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी समृद्धी मंडळाने 15मध्ये 11 जागांवर विजय मिळवला. ही निवडणूक माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आ. वैभवराव पिचड याचे नेतृत्वाखाली भाजप प्रणित शेतकरी विकास मंडळ व आ. डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत झाली.
कन्या विद्यालयात मतदान झाले. यावेळी 2 हजार 417 मतदरांपैकी 2 हजार 319 मतदारांनी मतदान केल्याने 95.94 टक्के मतदान झाले. सायंकाळी मतमोजणी झाली. विजयी उमेदवार – सर्वसाधारण मतदारसंघ- विश्वनाथ आरज (शेतकरी विकास 457), योगेश आरोटे (शेतकरी समृद्धी 492), भास्कर खांडगे (शेतकरी समृद्धी 494), सचिन रंधे (शेतकरी समृद्धी 465), ईश्वर वाकचौरे (शेतकरी समृद्धी 475), रुपेश कचरे (शेतकरी समृद्धी 477), रोहिदास भोर (शेतकरी समृद्धी 476).
महिला राखीव मतदार संघ- स्वाती तुकाराम कोरडे (शेतकरी समृद्धी 510), मंगल अनिल भांगरे (शेतकरी समृद्धी 503). ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ- रामकृष्ण आवारी (शेतकरी समृद्धी 569), भाऊसाहेब नाईकवाडी (शेतकरी समृद्धी 534). इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ – बाळासाहेब सावंत (शेतकरी विकास 502). आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ- भानुदास तिकांडे (शेतकरी समृद्धी 590). व्यापारी मतदारसंघ- इनामदार अब्दुल महंमद (शेतकरी विकास 106), किरण कानकाटे (शेतकरी विकास 108).