मुंबई – ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे समर्थक नेते नरेश म्हस्के म्हणाले,’महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवारांविरोधात अजित पवार यांनीच षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केलाय. गुरुवारी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या एमसीए निवडणुकीवरून आता राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.’ अस म्हणत त्यांनी पवार कुटूंबियात अलबेल नाहीये असाच खुलासा केला आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करतांना पुढे म्हणाले,‘ पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा.’ असं वक्तव्य म्हस्के यांनी केल आहे.
यावर आता माध्यमांशी बोलतांना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे,’ कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्यांना असल्या फालतू स्टेटमेंट करणाऱ्या मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. जी माझी भूमिका असते तीच भूमिका माझी कायम असते रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहे तो माझा पुतण्या आहे तो मला माझ्या मुलासारखा आहे.’ असं म्हणत पवार यांनी आपली बाजू मांडली आहे.