मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे… काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत डिनर डेटवर दिसली होती. त्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. यातच आता प्रसिद्ध अभिनेता आणि गायक हार्डी संधूने यावर स्पष्ट संकेत दिले आहे.
एका मुलाखतीत हार्डी संधूने सांगितले की, “परिणीती चोप्रा आपल्या आयुष्यात सेटल होत आहे. अखेर हे घडत असल्याने मला खूप आनंद होत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.” याशिवाय 2022 मधील स्पाय-थ्रिलर चित्रपट ‘कोड नेम: तिरंगा’चं शूटिंग करताना त्याने त्यांच्यात झालेला संवादही सांगितला. सेटवर लग्नाबद्दल आमची चर्चा होताना ती मला ती म्हणायची, ‘मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मला वाटेल की मला योग्य मुलगा भेटला आणि आता हे घडले आहे.’ एवढेच काय तर हार्डी संधूने फोन करुन परिणीतील शुभेच्छा दिल्याचेही सांगितले.
याआधी आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोरा यांनी देखील राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना ट्विटरद्वारे लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्विट करत लिहले होते की, ‘राघव आणि परिणीतीचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या जोडीला भरपूर प्रेम, आनंद आणि पाठिंबा मिळो. माझ्या शुभेच्छा.’ यावरुन स्पष्ट संकेत मिळत असल्याने लवकरच परिणीती राजकीय घराण्याची सून होणार असा अंदाज येतो.
दरम्यान, परिणीती लवकरच ‘कॅप्सूल गिल’ आणि ‘चमकी’ला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांपूर्वी परिणीती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘हाइट’ या चित्रपटात दिसली होती.