मुंबई ( Ajit Pawar on Uddhav Thackeray ) – महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज दुपारी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पटलावर अर्थसंकल्प मांडला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी हा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला.
अजित पवार यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे, कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा असल्याची टीका केली होती.
अर्थसंकल्प मांडल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आले.
मुख्यमंत्री याबाबत उत्तर देत असतानाच अजित पवार यांनी त्यांना थांबवत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबतच्या प्रश्नाला स्वतः उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. ( Ajit Pawar on Uddhav Thackeray )
‘मी जेव्हा त्यांच्यासोबत सत्तेत होतो, तेव्हा ते मी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक करायचे. आता इकडे आलो आहे तर टीका करत आहेत’ असं अजित पवार म्हणाले. विरोधक अर्थसंकल्पावर टीकाच करणार असेही पवार म्हणाले.
यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यात भर घालत, उद्धव ठाकरेंनी एकदा अर्थमंत्र्यांसमोरच स्वतःच आपल्याला यातील काही काळात नसल्याचं म्हणाले होते अशी आठवण करून दिली. ( Ajit Pawar on Uddhav Thackeray )
इतर महत्वाच्या बातम्या
“मनोज जरांगे बीड लोकसभेसाठी मविआचे उमेदवार असणार” भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मनोज जरांगे पाटलांनी मागितली शिंदे-फडणवीसांची माफी; केलं ‘हे’ मोठं विधान, काय म्हणाले पाहा….